घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ   

नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यांनी सोमवारी दिली. 
 
उज्वला योजनेतंर्गत मिळणार्‍या घरगुती सिलिंडरसाठी ही नवी दरवाढ लागू असेल, असेही ते म्हणाले.राजधानी दिल्लीत १४.०२ किलोचा घरगुती सिलिंडर ८०३ रुपयांऐवजी आता ८५३ रुपयांना मिळणार आहे. तर, उज्वला योजनेंतर्गत मिळणारा सिलिंडर ५०३ रुपयांऐवजी ५५३ रुपयांना मिळणार आहे. मागील आठवड्यात या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात  ४१ रुपयांची कपात करण्यात आली आली होती. त्यामुळे, १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर राजधानी दिल्लीत १८०३ रुपयांऐवजी १,७६२ रुपयांना मिळत आहे.       
 
मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर सध्या ८०२ रुपये ५० पैसे, कोलकात्यात ८२९ रुपये तर चेन्नईमध्ये ८१८ रुपये ५० पैसे दराने मिळत होता. सध्या मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर १७१४.५० रुपये, चेन्नईत १,९२४ रुपये आणि कोलकातामध्ये १,८७२ रुपयांना मिळत आहे. याआधी, ९ मार्च २०२४ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास १०० रुपयांनी कमी करण्यात आली होती. 
 

Related Articles